बोर्डाच्या प्रॅक्टिकल परीक्षांना " पाकिटांची " लागण


प्रत्येक संवेदनशील नागरीकासाठी वेदनादायी पोस्ट:

  बोर्डाच्या प्रॅक्टिकल परीक्षांना " पाकिटांची " लागण     
            शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे असे अनेकदा म्हटले जाते परंतू प्रत्यक्षात हि लागण इतकी हादरा देणारी असेन असे कधीच वाटले नव्हते .  भविष्यातील प्रवेशासाठी १०वीचे मार्क्स महत्वाचे असतात आणि त्यामुळे एका -एका मार्कांसाठी स्पर्धा असते . अर्थातच स्पर्धा असणे कधीही चांगले परंतू कुठल्याही स्पर्धेसाठी सर्वाधिक महत्वाचे असणारा नियम म्हणजे ती स्पर्धा % निकोप % असायला हवी . त्याच बरोबर स्पर्धे बरोबर असणारा धोका म्हणजे " % *फिक्सिंग* %" . हे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे . असेच प्रकार १०वीच्या अंतर्गत परीक्षांमध्ये होत असल्याचे अनेक शिक्षक खाजगीत सांगतात . 
   
   अनेक शाळांमध्ये विज्ञान प्रात्यक्षिकासाठी येणाऱ्या बहिस्थ (EXTERNAL  EXAMINER ) पर्येवेक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ठरावीक रक्कम गोळा करून  ' पाकीट ' रूपाने दक्षिणा दिली जाते आहे . त्या बदल्यात त्या पर्यवेक्षकाने गुणांची खिरापत वाटायची असते . केवळ सह्यांचे अधिकार बजवण्यासाठी त्या पर्यवेक्षकाची हजेरी असते
       प्रात्यक्षिक  परीक्षांचे पेपर हे थेट वर्गात लिहून घेतले जातात . नवी मुंबईतील अनेक शाळांमध्ये हे प्रकार सर्रासपणे होत आहेत असे अनेक शिक्षक खाजगीत सांगतात . अन्य विषयांच्या इंटर्नल परीक्षेसाठी  बाह्य परीक्षकच येत नसल्यामुळे सगळ्याच मुलांना पैकीच्या पैकी मार्क देता येत नाहीत म्हणून एखादा -दुसरा मार्क कमी केला जातो ( शेवटी जनाची नाही तरी मनाची आहे म्हणून ... ) 
  
     मुख्य प्रश्न केवळ विद्यार्थ्यांना वाटल्या जाणाऱ्या गुणांच्या खिरापती पुरता मर्यादीत नसून " *या शिक्षणातून " आपण देशासाठी कुठल्या प्रकारचे नागरीक (बी ) घडवत आहोत याचा आहे . शिक्षणातून दिले जाणारे " *मूल्य शिक्षण* " अशा प्रकारचे असेल तर देश कधीच भ्रष्टाचार मुक्त होऊ शकणार नाही .   देशातील प्रत्येक नागरीक भ्रष्टाचाराच्या विरोधात दंड थोपटून बोलत असला तरी देशातील भ्रष्टाचार आकाश -पातळ गाठत आहे , त्या मागचे प्रमुख कारण म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था तर नाही ना ?पाकीट संस्कृतीची बीजारोपण तर अशा परीक्षांतून केले जात नाही ना ?   असे  प्रश्न विचारल्यास वावगे ठरणार नाही . 
 
     ज्या शिक्षणातून समाज घडवण्याचे अपेक्षीत आहे त्याच शिक्षणातून समाज (बी )घडवण्याचे काम व्हावे हा संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा पराभवच म्हणावा लागेल . यातून जाणवणारा दुसरा धोका म्हणजे " *गुणवत्तेच्या कृत्रिम फुगवट्यामुळे ज्या शिक्षणातून विद्यार्थी -पालकांना %दिशा% मिळणे अपेक्षीत आहे त्याच शिक्षणातून दस्तुरखुद्द पालकांची आणि विद्यार्थ्यांची %दिशाभूल% होते आहे . 
शिक्षण विभागाने हे करावे : 
  • १) समाजाची दिशाभूल करणारी  अंतर्गत गुणदान पद्धत (INTERNAL ASSESSMENT ) पुढील वर्षीपासूनपूर्णतः बंद करावी . 
  • २)मार्कशीट वर अंतर्गत आणि बाह्य गुण स्वतंत्रपणे नमूद करावेत . 
  • ३) बोर्डाने या विषयावर शिक्षण तज्ज्ञांची खास बैठक बोलावून यावर उपाययोजना योजावेत .
                           हि पोस्ट वेदनादायी असली तरी ते आजच्या शिक्षण व्यवस्थेचे कटू वास्तव आहे . शिक्षणाला जडलेल्या अशा कॅन्सरपासून शिक्षण मुक्ती व्हावी असे आपल्यास वाटत असल्यास नक्की हि पोस्ट शेअर करून आपला आवाज संबंधीत यंत्रणे पर्यत पोचण्यास मदत करा 
सुधीर दाणी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा