गुरुवार, २६ जुलै, २०१२

ब्लॉग विषयीचे मनोगत :



   शिक्षणा व्यतिरीक्त अन्य विषयावरील मत व्यक्त करणारा ब्लॉग पाहण्यासाठी http://sudhirdani.blogspot.com  ला भेट द्या

                         
                      सर्वप्रथम सर्वांचे या ब्लॉगवर हार्दिक स्वागत .
                                      अपघातानेच काही व्यक्ती एखाद्या क्षेत्राकडे वळतात , त्यापैकी मी एक . फेब्रुवारी २००७ पर्यंत लिखाण या क्षेत्राशी दुरान्वये संबंध नव्हता , जो काही आला असेल तो विद्यार्थीदशे पुरताच .
  पण त्या "प्रसंगाने " या क्षेत्रा कडे वळविले .
झालेला प्रसंग असा :

            साल २००७ .  इयत्ता  चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा . शिष्यवृत्ती परीक्षा ह्या  गुणवत्तेची मापदंड मानावयाचा प्रघात असल्यामुळे संपूर्ण वर्षभर तयारी करून परीक्षा केंद्रावर पोहोचलो . मराठीचा एक तासाचा पेपर संपल्यानंतर मुलगी  कु . वैदेही वर्गाबाहेर आली . चेहरा रडवेला . पेपर अवघड गेला का ? असे वारंवार विचारूनही ती स्तब्ध  . शेवटी  खोदून  खोदून विचारल्यावर तिने विचारले ," जर अशीच परीक्षा असते तर

एवढा अभ्यास कशाला करावयाचा ? . त्यापेक्षा खेळले असते तर परवडले असते ."

                  झाले असे होते की , वैदेहीचा ज्या वर्गात नंबर आला होता त्या वर्गात नवी मुंबई महानगरपालिकेच्या

शाळेतील २२ मुले होती . इतिहास आणि आपल्या परंपरेला जागत पर्यवेक्षक असलेल्या शिक्षिकेने संपूर्ण ५०


प्रश्नाची उत्तरे वर्गात सांगितली . वर हेही सांगितलेकी याविषयी बाहेर कुठे वाच्यता करावयाची नाही .
    झाला प्रकार संबधित केंद्र प्रमुखाच्या निदर्शनात आणला असता मिळालेली उत्तरे जास्त संतापदायक होती . ते ('तो' हा शब्द जास्त   संयुक्तिक पण आपण आपली पातळी सोडणे  योग्य नाही म्हणून ...)  म्हणाले , " तुम्ही जास्तच सवेन्दनशील दिसतात , आम्हाला सर्वांचाच विचार करावा लागतो , तुम्ही पालक वैयक्तिक लक्ष देता , महानगरपालिकेतील मुलांचे पालक लक्ष देऊ शकत नाही , सरकारने सर्व शिक्षा अभियानातर्गत विशिष्ट निकालाचे बंधन घातलेले आहे , मग आम्हाला अशा मार्गांचा अवलंब करावाच लागतो , नियमाने तुम्हाला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळू शकत नाही , मी आत्ता तुम्हाला बाहेर हाकलू शकतो ".

      या प्रकारच्या वृतीला "नागडे " ( शिक्षक वर्गाप्रती  आदरयुक्त भावना जागृत ठेवून जाणीवपूर्वक हा शब्द वापरात आहे )  करण्याच्या हेतूनेच लढा देण्याचा निर्णय घेतला .

            ' नगरी' हिसका दाखवल्यानंतर पर्यवेक्षक बदलण्यात आले . सर्व केंद्र ' टाईट' झाले . दुसऱ्या दिवशी झाला प्रकार नवीमुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तासमोर मांडला . स्टार माझा , DNA या प्रसार माध्यमांनी हा विषय लावून धरला . त्याच शाळेतील एक शिक्षक मराठी वर्तमान पत्राचे पत्रकार असल्यामुळे बहुतांश (नवाकाळ वगळता ) मराठी वर्तमान पत्रांनी हे प्रकरण दाबले . शेवटी मा. अण्णा हजारे , कुमार केतकर याच्याशी सवांद साधला . पत्र लिहले . परीक्षा परिषदेकडे तक्रार केली . सरकारी नियमाप्रमाणे चौकशीचे नाटक चालू झाले . सर्वच सामील असल्यामुळे एकमेकांकडे बोट दाखवणे सुरु झाले  . माहिती अधिकाराच्या माध्यमातून हिसका दाखवल्यानंतर ठाणे शिक्षणाधिकारी यांची चौकशी समिती स्थापन झाली ......निकालाने सामुहिक कॉपी वर शिक्कामोर्तब झाले . २५ पैकी १८ मुलांना मराठीत ८८ मार्क्स मिळाले , त्याच विद्यार्थ्यांना इतर विषयात ४० ते ६० मार्क्स मिळाले . वैदेहीला गणितात ९८ मार्क्स मिळाले पण शिष्यवृत्ती  हुकली . अखेर ७ वी ला शिष्यवृत्ती तिने मिळवली .असो ....
        यातून २ गोष्टी समोर आल्या त्या म्हणजे १) कृत्रिम गुणवत्ता वाढीसाठी सर्रासपणे वापरला जाणारा सामुहिक कॉपी हा  "राजमार्ग" आहे , २) ज्या अर्थी शिक्षिका एवढ्या उघडपणे संपूर्ण वर्गाला उत्तरे सांगते त्या अर्थी तिची हि  पहिली वेळ नसावी व  त्या प्रकारचे निर्देश व पाठीशी घालण्याची हमी संबधीत यंत्र देत असावी . ३) सामुहिक कॉपी हि फक्त ग्रामीण भागात चालते हा केवळ भ्रम आहे , ती शिक्षणाची पंढरी संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबई सारख्या शहरात हि चालते ."  गरिबाचे ते लफडे , तर श्रीमंताचे प्रेम " या द्र्ष्टीकोनामुळे शहरी भागातील कॉपीचा गवगवा होत नाही इतकेच .
              दरम्यानच्या काळात लोकसत्ताचे श्री . आशिष पेंडसे यांनी त्यावर लेख लिहला . त्यांच्याकडे सर्व पत्रव्यवहार पाठवला . त्यांनी त्या वेळेस सांगितले की ,तुमची लेखन शैली EXPRESSIVE  आहे ,तुम्ही लिहा आम्ही त्याचा विचार करू ...त्यांना पाठवलेला " शुल्क वाढीचा भडका " हा लेख प्रसिद्ध झाला . तीच लेखनाची सुरुवात . नंतरच्या काळात श्री . प्रसाद केरकर यांचेही बहुमोल सहकार्य लाभले .

        प्रश्न फक्त मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा नव्हता . अश्या प्रकारातून विद्यार्थ्याच्या मनात न्युनगंडाची भावना निर्माण होऊ


शकते .अभ्यास,शिक्षक , एकूणच शिक्षण व्यवस्थे विषयी घृणा उत्पन्न होऊ शकण्याचा धोका होता . वास्तविक पाहता या तक्रारीचा मला काही फायदा होणार नाही याची जाणीव होती ." ....जाऊद्या  .... " या जग रहाटी नियमानुसार मी हि वागू शकलो असतो . यामुळेच यंत्रणा सोकावतात . एका नंतर एक बळी घेत राहतात . हेच दृष्ट चक्र तोडण्यासाठी आजपर्यंत लढा दिला . शिक्षण मंत्री , सचिव , परीक्षा परिषद  यांना वारंवार लेख पाठवले . निश्चितपने काही सकरात्मक बदल गेल्या काही वर्षात शिक्षण व्यवस्थेत झाले . अर्थातच ते केवळ माझ्यामुळे झाले  मी म्हणणार नाही . त्यात माझा खारीचा वाट आहे हे मात्र निश्चित.

           सरकारी यंत्रणा असवेन्द्नशील, निगरगट्ट, गेंड्यांच्या (समस्त गेंडा या प्राण्याची माफी मागून ) कातडीच्या असतात याचा मलाही अनुभव आलाच पण वारंवार पाठपुरावा केल्यास त्यानाही घाम फुटतो हा अनुभवही आला . ....." व्यवस्थेशी  आजही संघर्ष चालूच आहे .सरकारी यंत्रणा भी हिलती है, हिलानेवाला चाहिये! " याचाही प्रत्यय आला . सुरुवातीच्या काळात जबरदस्त मानसिक त्रास झाला ,पण आज त्यावेळी उचलेल्या पावलाचे समाधान वाटते . ज्यांनी -ज्यांनी या काळात मानसिक आधार दिला त्या सर्वांचे आभार . सर्व प्रसार माध्यमांचे आभार . महाराष्ट्रातील अनेक वाचकांनी फीडबँक देऊन प्रोस्ताहन दिले त्यांचेही आभार .
             आलेल्या अनुभवातून वाचकांना एक गोष्ट विनम्रपणे नमूद करावी वाटते की जेव्हा कुठे समस्या असेल त्या संधर्बात असणाऱ्या विभागाकडे लेखी तक्रार जरूर करावी . लेखी पत्राची सरकारी यंत्रणांना दखल ख्यावीच लागते .  आपण प्रथम आपले एक पाऊल पुढे टाकावयास हवे , समोरचा त्यामुळे पाऊल उचलण्यास मजबूर होतो . बहुतांश वेळेला आपण इथेच चुकतो आणि त्यामुळे यंत्रणा आणखीनच मग्रूर बनतात .

            व्यवस्था परिवर्तन सर्वाना हवे आहे . प्रश्न आहे तो ते परिवर्तन घडवून आणावयाचे याचा . "शिवाजी जन्माला यायला हवा पण तो शेजाऱ्याच्या घरात"  ( हल्ली तर शिवाजी शेजारी पण नको , कशाला आपणास त्रास हि  वृत्ती वाढत आहे) या वृतीला तिलांजली देणे काळाची गरज आहे . परिवर्तन हवे ना ! मग सुरवात आपणापासूनच करूया !!
  BE A CHANGE AND U  R THE SOURCE   " हाच खरा व्यवस्था परिवर्तनाचा गुरुमंत्र आहे .

          ब्लॉगची संकल्पना व डिझाईन साठी मित्र श्री . अशोक सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले , त्यांचेही आभार .
                    आपल्या प्रतिक्रीयांच्या  विस्तृत प्रतिक्षेत .प्रत्येक लेखाच्या शेवटी प्रतिक्रिया देण्याची सुविधा उपलब्ध आहे  .कुठल्याही प्रतिक्रिया खास करून काही त्रुटी असतील तर अवश्य कळ्वा.

आपले स्वागत  आहे . प्रतिक्रिया प्रकाशीत करताना आपला mail  id  देणे अनिवार्य आहे . प्रतिक्रिया submit  करताच आपणास mail  id  साठी window  येईल
धन्यवाद !                            
                                                                                                                  आपला  कृपाभिलाषी ,
                                                                       सुधीर लक्ष्मीकांत दाणी. भ्रमणध्वनी ९८६९ २२ ६२ ७२
 ताक: ब्लॉगच्या डाव्या बाजूला आपणास लेखांची यादी मिळेल , त्यावर जाऊन KLICK केल्यास संपूर्ण लेख वाचता येईल .

                                                           
 
                                                                                                                                

                                                                                                                                                                                                               
      

            
        
             





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा