सरकार की बुजगावणे .....
हातातोंडाशी आलेला घास पक्षी खाऊ नयेत यासाठी शेतात बुजगावणे उभे केलेले असते . प्रत्यक्षात पिकाचे नुकसान करावयाचे की नाही हे संपूर्णपणे पक्षांवर अवलंबून असते . पाखरांनी नुकसान नाही केले तर आपसूकच त्याचे श्रेय बुजगावण्याला जाते अन्यथा ....
" खाजगी वैद्यकीय संचालाकासमोर सरकारची सपशेल माघार , प्रवेश नियंत्रणाच्या निर्णयापासून घुमजाव " हे वृत्त वाचून अशीच काहीशी भावना मनात आली . वर्तमान परिस्थितीत खाजगी संस्थाचालकांसमोर सरकारची अवस्था शेतातल्या बुजगावण्या सारखी झाली आहे . केजी पासून पीजी पर्यंतचे शिक्षण यास अपवाद नाही . याच दबावाखाली 'शुल्क नियंत्रण कायदा ' बासनात गुंडाळण्यात आला आहे . सामान्य जनता फक्त हताशपणे हे पाहत हातावर हात ठेवून बसण्यापलीकडे काहीच करू शकत नाही . शिक्षण नाही म्हणून आर्थिक परिस्थितीत बदल नाही आणि आर्थिक स्थिती ठीक नाही म्हणून शिक्षण नाही , या दृष्ट चक्रात जनता भरडली जात आहे . असवेन्दनशील शासन आणि हतबल जनता यामुळे आपले शैक्षणिक भवितव्य रामभरोसे असणार याविषयी तिळमात्र शंका नाही .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा