‘प. प. पुस्तकाचा! भ. भ. भ्रष्टाचाराचा!’ (२८ जाने.) आणि ‘खासगी
प्रकाशकांच्या हितासाठी शिक्षण मंडळाच्या पुस्तकांची
उशिरा छपाई’ (३०
जाने.) हे वृत्त वाचले. महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या देशातील
पुरोगामी राज्याच्या एकूणच शैक्षणिक वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण
करणारी ही वृत्ते आहेत. देशसंरक्षणासाठी लढणाऱ्यांच्या जॅकेट व शवपेटय़ांच्या
व्यवहारांतही जिथे भ्रष्टाचार होऊ शकतो त्या देशात विद्यादानासाठी आयुध म्हणून उपयोगी
येणाऱ्या पुस्तकासंबंधी भ्रष्टाचार होणे हे फारसे धक्कादायक नाही.
कोठारी कमिशनच्या शिफारशीनुसार २७ जानेवारी १९६७ रोजी ‘महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ’ स्थापन करण्यामागे मुख्य हेतू हा होता की, माफक दरात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतची दर्जेदार पाठय़पुस्तके शासनाने मान्य केलेल्या अभ्यासक्रमानुसार छापून वितरित करणे. हा हेतू खरंच पूर्ण झाला का? माफक दर हा हेतू सद्य:परिस्थितीत साध्य झाला आहे, असे गृहीत धरले तरी त्याचा दर्जा मात्र प्रश्नांकित राहिला आहे. मुखपृष्ठ, मलपृष्ठ व लिखाणासाठी वापरलेला कागद, त्याची बांधणी यात कालानुरूप तिळमात्रही बदल दिसत नाही. शिक्षकांकडून विविध शैक्षणिक साधने वापरून अध्यापन अधिक प्रभावीपणे होणे अभिप्रेत असताना ‘पाठय़पुस्तके’ हे सर्वात महत्त्वाचे साधन एवढे दर्जाहीन का?
विद्यार्थीदशेत एकूणच जीवनऊर्मी तीव्र असते, मन चंचल असते, आवडीनिवडीही तीव्र असतात. काही गोष्टींविषयी प्रथमच आवड निर्माण होते, तर काहींबद्दल सुरुवातीसच नावड निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळेच अध्ययन, अध्यापन प्रक्रियेतील महत्त्वाची भूमिका बजावणारे पाठय़पुस्तक हे विद्यार्थ्यांना आपलेसे करणारे, आकर्षक रंगसंगतीयुक्त असावे. मुखपृष्ठ मनमोहक असण्याबरोबरच त्यासाठी वापरण्यात येणारा कागद जाडसर व प्लास्टिकयुक्त आवरणासहित असावा. पुस्तकाची बांधणीसुद्धा किमान वर्षभर हाताळण्यास अनुरूप असावी.
पाठय़पुस्तकाचा दर्जा उंचावताना ‘माफक दर’ या हेतूला बाधा येत असेल तर त्यावर जाहिरातीच्या माध्यमातून मात करता येईल. मुखपृष्ठाच्या आतील बाजूस, मलपृष्ठावर किंवा दोन सत्रांच्या अभ्यासक्रमाच्या विभाजनासाठी अतिरिक्त कागद टाकून त्यावर शैक्षणिक साहित्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीची जाहिरात देता येईल. किंवा खासगी प्रकाशकाकडून जाहिरातीच्या मोबदल्यात दर्जेदार पुस्तकाची छपाई करून घेता येईल.
शैक्षणिक वर्षांची सुरुवात जूनमध्येच होते, हे ज्ञात असतानासुद्धा प्रत्येक वर्षी हा गोंधळ कशासाठी? याही वर्षी इयत्ता अकरावीच्या पाठय़पुस्तकाबाबत गोंधळ सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यावरील पाठय़पुस्तकाबाबत एवढी उदासीनता का? विद्यार्थी-पालक यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार नव्हे का? स्पर्धा नसल्यामुळे असे होते का? प्रत्येक शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला प्रत्येक इयत्तेसाठी आवश्यक असणारी पाठय़पुस्तके नियमित वेळेत सुबक, आकर्षक, टिकाऊ व माफक दरात मिळाली तर पालक व विद्यार्थी पाठय़पुस्तक मंडळाला निश्चितच दुवा देतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा