समाज मग तो कालचा असेल , आजचा असेल वा उद्याचा असेल या समाजाचा
खरा शिल्पकार हा 'शिक्षक'च होता , आहे
आणि असेल हे गृहीतक समाजमान्य आहे .
यातील भूतकाळ
आणि काही अंशी वर्तमानकाळाबाबत शिक्षकवर्गाने आपल्या कृतीतून
शिक्कामोर्तब केलेले आहे . याविषयी
समाजाला सार्थ अभिमान आहे आणि समाजातील
प्रत्येक घटकाने आपल्या कृतीतून त्यावर वेळोवेळी
शिक्कामोर्तब केलेले आहे . थोडक्यात काय तर शिक्षक वर्ग हा समाजासाठी
दिशादर्शकाचे काम करणारा प्रमुख मार्गदर्शक आहे .
....काळाच्या स्थित्यंतरात
शिक्षकाच्या सामाजिक वर्तनाविषयी आणि पर्यायाने त्याच्या समाजाच्या जडणघडणीच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह
निर्माण झाले आहे हे नाकारता न येणारे कटू सत्य आहे . याच दृष्टिकोनातून आजचा समाज
आणि शिक्षक यावर भाष्य करणारे हे टिपण . हा लेख वाचताना वाचकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे
अपेक्षीत आहे की , या लेखात केलेले भाष्य हे शिक्षकांप्रती आदर
ठेवूनच केलेले आहे .
शिक्षक हाच राष्ट्राचा
खरा शिल्पकार:
पाचवीत शिकणाऱ्या माझ्या मुलीला शिकवत
असताना वेळोवेळी तिची प्रतिक्रिया असते की , " नाही ! असे नाही . आमच्या टिचरने असे
सांगितले आहे आणि तेच बरोबर आहे .आमच्या टीचर अशा !! .. आमच्या टीचर तशा !! एकुणात काय तर
आमच्या टीचर म्हणजेच योग्य , सत्य , बरोबर आणि आदर्श ...
" हि केवळ एक प्रातिनिधिक
भावना झाली . सर्वच विद्यार्थ्यांची आणि त्यातही खासकरून जडखडणीच्या वयातील १०० टक्के
विद्यार्थ्यांची शिक्षकांप्रती हीच भावना असते .
शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी दैवत असते
आणि भक्ताचा जसा देवावर विश्वास असतो तद्वतच विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर विश्वास
असतो . शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी दैवत असते
आणि भक्ताचा जसा देवावर विश्वास असतो तद्वतच विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर विश्वास
असतो .
शिक्षकाच्या केवळ अध्यापनाचाच विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर प्रभाव नसतो
तर , शिक्षकाच्या
वर्गातील वागण्या -बोलण्याच्या , वेशभूषा आणि एकुणातच सर्वच वर्तवणुकीचा
विद्यार्थ्यांवर प्रभाव होत असतो . एवढेच कशाला तर शिक्षकाच्या सामाजिक वर्तनाचा
देखील यात सिंहाचा वाटा असतो आणि ग्रामीण भागात याची मोठ्या प्रमाणात प्रचिती येते . एका शिक्षकाच्या कार्यकाळात त्या शिक्षकाच्या
हाताखालून किमान दोन पिढ्या जातात . आजचे विद्यार्थी हेच उद्याचे नागरीक असतात या
न्यायाने नागरीकांची जडघडण ,समाजाची जडणघडण आणि पर्यायाने
राष्ट्राची जडघडणीचे खरे शिल्पकार हे शिक्षकच असतात .
सुवर्ण
भूतकाळ , अस्वस्थ
वर्तमान :
स्थित्यंतर
हा निसर्गाचा
नियम आहे
आणि त्यास
कोणीही अपवाद
असत नाही
. साधारणपणे १५-२०
वर्षांपर्यंत म्हणजे
डिजिटल क्रांतीचा
प्रसार
होण्यापूर्वी शिक्षक संपूर्ण
गावासाठी
कॉऊन्सलर , मार्गदर्शक
, तारणहार , हिशोबनीस
, संकटमोचक
आणि फॅमिली
मेंबर असे
. माझे बालपण
आणि शिक्षण
खेड्यात झालेले
असल्यामुळे याची
प्रचिती अनेकवेळा
आलेली आहे
. घर -जमीन
खरेदीचा निर्णय
असो , लग्न
जुळवण्याचा निर्णय
असो , घर
-समाजातील कलह
असो अशा
जन्मापासून ते
मरणापर्यंतच्या प्रत्येक
प्रसंगी शिक्षकांची
भूमिका महत्वाची
असे . 'गुरुजी
' सांगितलं तो
अंतिम निर्णय
असा तो काळ
होता . राजकारणी
देखील गुरुजींच्या
घराचा उंबरठा
ओलांडत असत
. असा तो सुवर्णकाळ
होता .
गेल्या २
दशकांत सर्वच
व्यवस्थांच्या पुलाखालून
पाणी वाहिले
आहे . काही
ठिकाणी ते
गढूळ झाले
आहे . शिक्षण
व्यवस्था , शिक्षण
व्यवस्थेचा कणा
असणारा शिक्षक
आणि समाज
देखील त्यास
अपवाद असू
शकत नाही
. गुरुजी ते
सर (मास्तर
!) हे शिक्षकाच्या
बाबतीतील मोठे
स्थित्यंतर . शिक्षकांचा
अंगरखा घालून
निश्चिम सेवेचे
व्रत घेत
ज्ञानार्जन करणारी
पिठी रिटायर
होत गेली.
त्यांची जागा
मॉडर्न शिक्षकांनी
घेतली . जागतिकीकरण
, आर्थिक क्रांती
याचे वारे
जसे जसे
ग्रामीण भागात
पोहचू लागले,
हातात मिळणाऱ्या
पगारावरचे 'शून्य
' वाढू लागले तसे
तसे गावात
राहून गावाच्या
ड्रायवर सीटवर
असणारे गुरुजी
काळाच्या ओघात
;अडचणींचा ' गाव
सोडून 'सुविधांनी
परिपूर्ण ' अशा
तालुक्याच्या -जिल्ह्याच्या
गावी राहण्यासाठी गेले
. येथूनच गुरुजींची
समाजाशी असणारी
नाळ तुटत
गेली . सवड
मिळेल त्याप्रमाणे
शाळेवर येणाऱ्या
शिक्षकांनी
वर्गाच्या ४
भिंती बाहेरील विश्वासी
फारकत घेण्यात
धन्यता मानल्यामुळे
समाज आणि
शिक्षक यांच्या
मध्ये भिंत
उभी राहिली
. समाज- शिक्षक
नात्यातील ओलावा
काळाच्या ओघात
उडून गेल्यामुळे
त्यांच्यात केवळ
आणि केवळ
व्यावहारिक नाते
निर्माण झाले
.
समाज
आणि शिक्षकांतील
नात्याची वीण
विसविशीत होण्यामागे
अर्थातच
समाज आणि गेल्या
२ दशकातील
सामाजिक -राजकीय
-सांस्कृतिक -आर्थिक
स्थित्यंतरे कारणीभूत
जबाबदार आहे
. शिक्षणाचे वारे
जसे जसे
घरोघरी पोहचले
तसे तसे
खेड्यातील कर्ताधर्ता
स्वतःस 'शहाणा
-सवरता' समजू
लागला , त्यास
कोणाच्या मार्गदर्शनाची
गरज उरली
नाही . दरम्यानच्या
काळात शिक्षणाचे
खाजगीकरण झाले
. गावोगावी खाजगी शैक्षणिक
संस्था
' उघडल्या '. त्यात
ज्ञानार्जनसाठी 'प्रवेश' मिळवण्यासाठी
भावी शिक्षकांना
''किंमत" मोजण्याचा
'प्रगत काळ
' सुरु झाला
. प्रत्यक्ष कागदावरील
पगारांपेक्षा कमी
पगार देणे
हा आपला
'घटनादत्त ' अधिकार
असल्याची धारणा
फ्लेक्सवरील शिक्षण
महर्षींची झाल्यामुळे
शिक्षक स्वतःच
'अन्यायग्रस्त ' होऊ
लागला . " कालाय
तस्मै नम:
" या न्यायानुसार
शिक्षकांची भूमिका
बदलत गेली
. समाज मार्गदर्शकाचा
सदरा खुंटीला
टांगून शिक्षकांनी
संस्थाचालकांच्या 'राजकीय
कार्यकर्त्याचा ड्रेस
' स्वीकारला . समाजातील
त्याच्या आदराच्या
स्थानास ओहोटी
लागू लागली
. जो
शिक्षक स्वतःवरील
अन्यायाला वाचा
फोडू शकत
नाही त्याच्या
कडून समाजास
न्याय देण्याची
अपेक्षा हे दिवास्वप्न
भासू लागल्यामुळे
तर 'शिक्षक
आणि समाज नात्याचा
' वर्तमान
काळवंडला गेला
.
समाज -शिक्षक : परस्परांचे प्रतिबिंबच :
शिक्षक
हा घटक
समाजातूनच येत
असल्यामुळे समाज
आणि शिक्षक
हे सर्वच
दृष्टीने एकमेकांचे
प्रतिबिंब असतात
. मग तो काळ
पूर्वीचा असेल
, आत्ताचा असेल
की पुढचा
असेल , कुठलाच
काळ अपवाद
असत नाही
.
म्हणूनच
वर्तमानातील शिक्षकांच्या
नैतिक,सांस्कृतिक अधःपतनास
समाज देखील
शंभर टक्के
जबाबदार आहे
. असे असले
तरी शिक्षक
हा बुद्धिजीवी
घटक मानला
जात असल्यामुळे
त्याची जबाबदारी
अधिकची ठरते
आणि त्यामुळेच
समाजातील विविध
घटक त्यांना बोल
लावताना दिसतात
. आजही बहुतांश
शिक्षक हे
आपली जबाबदारी
अतिशय 'नेटाने
' पार पाडताना
दिसतात . सरकारी
शाळांतील अनेक
शिक्षक -शिक्षिकांनी
आपल्या कृतीतून
ते सिद्ध
केले आहे
.
दुर्दैवाने
अधिकाधिक शिक्षकीपेशातील
वर्ग हा व्यसनाधीनताकडे
वळल्यामुळे , अनेक
शिक्षकांचा जुगार
-बलात्कार यासम
गैरकृत्यात सहभागाची
निष्पत्ती , ज्यांच्यावर
कळ्या जपण्याची
नैतिक जबाबदारी
आहे अशा
पालकत्व समान
शिक्षकांनी कळ्या
घुडण्याचे कृत्य
यामुळे शिक्षकी
पेशाच्या 'पवित्रेवर
' कलंक लागला
जात आहे
. होय ! पुन्हा
तेच म्हणावे
लागेल की
, समाज आणि
शिक्षक हे
परस्परांचे प्रतिबिंब
असल्यामुळे शिक्षकीपेशावर
निर्माण झालेल्या
'प्रश्नचिन्हा' स
वर्तमानातील सामाजिक
नैतिक -सांस्कृतिक
अध:पतनाचा
सिंहाचा वाटा
आहे हे नमूद
करावे लागेल
.
शिक्षक 'गूगल'
स्मार्ट हवेत : पूर्वीच्या
काळी कुठल्याही
समस्या /प्रश्नाचे
उत्तर म्हणजे
गुरुजी हा
नागरीकांची धारणा
होती . आजच्या
काळात मोठ्या
प्रमाणात ती
गरज 'गूगल
' च्या माध्यमातून
पूर्ण केली
जाते . प्रत्येक
व्यक्तीला गूगल
करणे शक्य
नसते , त्यामुळे
शिक्षकांनी गूगल
स्मार्ट असायला
हवे म्हणजे
त्यांनी सातत्याने
ज्ञानाच्या बाबतीत
अद्यावत असायला
हवे . ज्ञानी
व्यक्तीला समाजात
सर्वोच्च स्थान
असते आणि
म्हणूनच जनतेच्या
मनात पूर्वीचे
आदराचे स्थान
पुनर्स्थापित करण्यासाठी
शिक्षकांनी गूगल
स्मार्ट असणे
अत्यंत आवश्यक
दिसते .
दृष्टिक्षेपातील उपाय :
·
शिक्षकांचा प्रभाव हा विद्यार्थ्यांच्या जडघडणीत अत्यंत मोलाची भूमिका बजावत असल्यामुळे शिक्षकांचे वर्तन हे अत्यंत आदर्शवादी असणे काळाची गरज आहे .
·
विद्यार्थ्यांना ओरडायचे नाही , मारायचे नाही यासम नियमांमुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यात दुरावा होत असल्यामुळे शिक्षकांवरील अनावश्यक निर्बंध उठवायला हवे.
·
एक अपात्र शिक्षक म्हणजे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह हे ध्यानात घेत , शिक्षक अधिक मॅच्युर्ड असण्यासाठी शिक्षकांसाठीची किमान पात्रता पदवीची असावी .
·
शिक्षक आणि समाज यांच्या नात्यातील शिवण अधिक घट्ट होण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो त्याच ठिकाणी निवासास असणे अनिवार्य असावे .
·
विद्यार्थ्यांच्या मनातील शिक्षक प्रतिमाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यासमोर शिक्षकांविषयी अपशब्द वापरणे कटाक्षाने टाळावेत
·
शिक्षकांचे वर्तन हा समाजाचा आरसा असल्यामुळे शिक्षकांनी अपकृत्य -व्यसने यासम गोष्टींपासून चार हात दूर रहायला हवे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा