बुधवार, ११ मार्च, २०१५

“ कॉपीमुक्त परीक्षां ” चे अच्छे दिन धूसरच !!!

             “ कॉपीमुक्त परीक्षांचे अच्छे दिन धूसरच !!!

  
            बोर्डाची परीक्षा = सावळा गोंधळ , बोर्डाची परीक्षा = कॉपीचा सुकाळ  बोर्डाची परीक्षा = प्रश्नपत्रिकातील चुका , शिक्षक -संस्थाचालकांची १०० टक्के निकाल लावण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी , बोर्डाची परीक्षा = बोर्डातील कर्मचारी -अधिकाऱ्यांची 'धृतराष्ट्र -गांधारी ' भूमिका , बोर्डाची परीक्षा = शिक्षण मंत्र्यांच्या कॉपीमुक्तीच्या राणाभीमदेवी घोषणा आणि बोर्डाची परीक्षा + गैरप्रकारात एक पाऊल पुढे असे घट्ट समीकरण गेल्या काही वर्षात वेळोवेळी अधोरेखीत होते आहे .

        प्रती वर्षी प्रमाणे या वर्षीही दहावी -बारावीच्या परीक्षा चर्चेत आहेत . बारावीच्या रसायनशास्त्र आणि बीजगणिताच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्यामुळे ११ गुणांचा विद्यार्थ्यांना दिला जाणारा 'शिमगा ' बोनस , कॉपीचे माहेरघर असणाऱ्या मराठवाड्यात गणिताचा पेपर सोडवताना सापडलेले शिक्षक व्हॉटसअपवर फिरणाऱ्या प्रश्नपत्रिका यासम  दुर्दैवाने उजेडात आलेले प्रकरणे आणि बोर्डाच्या आशीर्वादाने  आजही सर्रासपणे चालू असणारे  परंतु सुदैवाने प्रकाशात न आलेली अगणित गैरप्रकार हा विद्यमान परीक्षांचा अटळ भाग झाला आहे . या मुळे एकूणच बोर्डाच्या विश्वसार्ह्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . गैरप्रकारांनी ओतप्रत भरलेले बोर्ड बरखास्त केलेलेच बरे ? अशी जनभावना वाढत आहे .

         मुळातच असे का होते आणि हे टाळता येऊ शकते का ? हा खरा प्रश्न आहे . असे होते कारण बोर्डाचे आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेचे झालेले राजकीय ध्रुवीकरण . बोर्ड हे धर्मशाळा झाली आहे आणि त्यामुळे  शिक्षणाशी दुरान्वये संबंध नसणाऱ्या व्यक्तींचे ते आश्रयस्थान झाले आहे . त्यामुळे असे होतच राहणार हे एक उत्तर आहे . दुसऱ्या प्रश्नाचे अर्धे उत्तर आहे ' होय, हे पूर्णपणे टाळता येऊ शकते ' परंतु 'तसे करण्याची इच्छा आणि धाडस बोर्डात आणि शिक्षण विभागात नाही ' हे त्याचे उरलेले अर्धे उत्तर आहे .

     एक अतिशय साधे उदाहरण येथे नमूद करावेशे वाटते . एका महाविद्यालयात कॉपी होत असल्याचे कळल्यावर मी बोर्डाच्या अध्यक्षांच्या कार्यालयात फोन ( ०२०-२५६५१७५) केला . मिळालेले उत्तर अतिशय धक्कादायक आणि मन विषण्ण करणारे होते . मला सांगितले की तुम्हाला जर तक्रार करावयाची असेन तर सर्वप्रथम तुम्ही लेखी तक्रार आमच्याकडे पाठवा . तुमच्या तोंडी माहितीवर कुठलीही कारवाई होणार नाही. सांगा ! या मानसिकतेत कॉपी मुक्त परीक्षा केवळ मृगजळच ठरणार हे शाळेत न जाणारे शेंबडेपोर ही सांगेन . गेल्यावर्षी कांदिवली पेपरफुटीचे काय झाले ? गेल्या ३ वर्षात गैरमार्गाशी लढा या उपक्रमात नमूद केल्याप्रमाणे परीक्षा हॉलमध्ये कॉपी सापडणाऱ्या किती शिक्षकांवर कारवाई केली ? प्रश्नपत्रिकांत चुका करणाऱ्यावर बोर्ड काय कारवाई करते ? यासम अनेक प्रश्नांत  बोर्डाच्या भोंगळ कारभाराचे उत्त्तर दडले आहे .

        मुळातच परीक्षा जर कॉपीमुक्त पद्धत्तीने घेतल्या तर निकालाचा आलेख ढासळेल याची भीती शिक्षक-संस्था चालक -बोर्ड -आणि शिक्षण खाते या सर्वांना असल्यामुळे अनेक सहज सोपे उपाय दृष्टीक्षेपात असून आणि ते वेळोवेळी मेल , प्रत्यक्ष शिक्षण सचिव , बोर्डाचे अध्यक्ष , विभागीय सचिव आणि शिक्षण मंत्री यांना पाठवून देखील त्याला केराची टोपली दाखवली जाते . कॉपी होतच नाही असे भासविले जाते त्यामुळे उपाय योजना आपसूकच निकालात निघतात . बोर्डाच्या परीक्षांचे वास्तव जाणून घेण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी स्वतः केंद्रांना आकस्मित भेटी द्याव्यात . त्याच बरोबर शिक्षक खात्यातील सचिव व अन्य अधिकाऱ्यांना तसे निर्देश द्यावेत .

   शिक्षण मंत्र्यांनी खालील कॉपीमुक्त परीक्षांसाठी उपायांचा विचार करावा : विषय शिक्षकांना त्या त्या पेपरच्या दिवशी शिक्षणाधिकारी कार्यालयात हजार राहणे अनिवार्य करणे , विद्यार्थ्यांना स्वतःची शाळा केंद्र म्हणून न देणे , शाळा-शाळातील पर्यवेक्षकांची अदलाबदल करणे , गणितासारख्या विषयात स्वाध्यायातील प्रश्नच प्रश्नपत्रिकेत देताना आकडे बदल करणे , शिक्षणबाह्य लोकांची त्रयस्त पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करणे , परीक्षा केंद्रावर मोबाईलला पूर्णतः बंदी घालणे , परीक्षार्थी विद्यार्थी / पालकांचा फीड बॉक घेणे , प्रसारमाध्यमांना केंद्राला भेट देण्याची परवानगी देणे , आगामी ३ वर्ष बोर्डाचा निकाल आणि अनुदान याचा संबंध तोडणे , संस्थाचालकांना परीक्षेच्या काळात प्रवेशबंदी , कॉपीची तक्रार करण्यासाठी  मंत्रालयात तक्रार कक्ष , जे विद्यार्थी -शिक्षक-पालक व्हिसलब्लोअरची भूमिका निभाऊ इच्छितात त्यांना आपले मत निनावी किंवा नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर पाठवण्याची व्यवस्था निर्माण करणे .

       बोर्डाच्या परीक्षांच्या निकालात कॉपीचा सिंहाचा वाटा आहे हे बोर्ड -शिक्षण खाते नाकारत असले तरी असरचा रिपोर्ट त्याला छेद देतो हे डोळ्याआड करता येणार नाही . याविषयीचे मत शिक्षणमंत्र्यांनी सार्वजनिक मंचावरून व्यक्त करावेत म्हणजे कॉपीमुक्त परीक्षांचे अच्छे दिन कधी येणार की येणारच नाहीत याविषयीचा संभ्रम दूर होईल. 'आप' मधील ' यादवी ' वर चर्चा करणाऱ्या प्रसारमाध्यमांना मात्र शिक्षणातील यादवीकडे लक्ष देण्यास स्वारस्य का नाही हा देखील एक यक्षप्रश्न आहे . 
                                                                                                       

बुधवार, ४ मार्च, २०१५

शिक्षण मंत्र्यांनी स्वत: केंद्रांना भेटी द्याव्यात .

                                शिक्षण मंत्र्यांनी स्वत: केंद्रांना भेटी द्याव्यात .
    बारावी परीक्षेतील कॉपी संदर्भात बोर्डाशी संपर्क साधला असता येणारा अनुभव अतिशय संतापजनक होता . प्राप्त माहितीनुसार बोर्डाच्या तक्रार   कक्षाकडे तक्रार केली असता त्यांनी तक्रारीची गंभीर दखल घेण्याऐवजी तक्रार दाराच्या संपूर्ण तपशीलासह fax पाठविण्यास सांगितले . बोर्ड अध्यक्षांच्या कार्यालयात फोन लावून देखील टोलवाटोवीचे उत्तर मिळाले . ज्या पालकाचे पाल्य परीक्षा देते आहे तो पालक संपूर्ण तपशिलासह परीक्षा केंद्रावरील कॉपी संदर्भात माहिती कशी देईल हि माहिती संबंधीत शाळा -महावियालायाकडे पोहोचणार नाही आणि त्याच्या मुले आपल्या पाल्याला जाणीवपूर्वक टार्गेट केले जाणार नाही याची हमी बोर्ड लेखी देईल का ? बोर्डाने नागरिकांच्या तक्रारींची दखल घ्यावी अन्यथा कॉपी मुक्त परीक्षाच्या वल्गना बंद कराव्यात . जनतेवर विश्वास नसेल तर भविष्यात शिक्षण मंत्र्यांनी स्वत: परीक्षा केंद्रांना भेटी द्याव्यात .



     शिक्षण क्षेत्रातील वास्तवता कधीच पुढे आणली जात नाही .शिक्षणक्षेत्रातील शिक्षक -अधिकारी यांचा कल हा नेहमीच ' ऑल इज ओके ' रिपोर्ट पाठवण्याकडे असतो . याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बोर्डाच्या दहावी / बारावीच्या परीक्षा . शिक्षण क्षेत्राचा अभ्यासक या नात्याने अनेक विद्यार्थी -शिक्षक -पालक यांच्याशी संपर्क येतो . आजही ग्रामीण आणि शहरी भागात बोर्डाच्या परीक्षेत कॉपी होतेच आहे . फरक एवढाच पडला आहे की , पूर्वी केंद्राबाहेर जी जत्रा असायची , बाहेरून कॉप्यांचा पुरवढा व्हायचा त्याला प्रतिबंध बसला आहे परंतु त्याची परिपूर्ती हि विषय शिक्षक , संस्था चालक करताना दिसत आहेत .

       मुळातच परीक्षा जर कॉपीमुक्त पद्धत्तीने घेतल्या तर निकालाचा आलेख ढासळेल याची भीती शिक्षक-संस्था चालक -बोर्ड -आणि शिक्षण खाते या सर्वांना असल्यामुळे अनेक सहज सोपे उपाय दृष्टीक्षेपात असून आणि ते वेळोवेळी मेल , प्रत्यक्ष शिक्षण सचिव , बोर्डाचे अध्यक्ष , विभागीय सचिव आणि शिक्षण मंत्री यांना पाठवून देखील त्याला केराची टोपली दाखवली जाते . कॉपी होतच नाही असे भासविले जाते त्यामुळे उपाय योजना आपसूकच निकालात निघतात . बोर्डाच्या परीक्षांचे वास्तव जाणून घेण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी स्वतः केंद्रांना आकस्मित भेटी द्याव्यात . त्याच बरोबर शिक्षक खात्यातील सचिव व अन्य अधिकाऱ्यांना तसे निर्देश द्यावेत .

   शिक्षण मंत्र्यांनी खालील कॉपीमुक्त परीक्षांसाठी उपायांचा विचार करावा : 

   विषय शिक्षकांना त्या त्या पेपरच्या दिवशी शिक्षणाधिकारी कार्यालयात हजार राहणे अनिवार्य करणे , विद्यार्थ्यांना स्वतःची शाळा केंद्र म्हणून न देणे , शाळा-शाळातील पर्यवेक्षकांची अदलाबदल करणे , गणितासारख्या विषयात स्वाध्यायातील प्रश्नच प्रश्नपत्रिकेत देताना आकडे बदल करणे , शिक्षणबाह्य लोकांची त्रयस्त पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करणे , परीक्षा केंद्रावर मोबाईलला पूर्णतः बंदी घालणे , परीक्षार्थी विद्यार्थी / पालकांचा फीड बॉक घेणे , प्रसारमाध्यमांना केंद्राला भेट देण्याची परवानगी देणे , आगामी ३ वर्ष बोर्डाचा निकाल आणि अनुदान याचा संबंध तोडणे , संस्थाचालकांना परीक्षेच्या काळात प्रवेशबंदी , कॉपीची तक्रार करण्यासाठी  मंत्रालयात तक्रार कक्ष , जे विद्यार्थी -शिक्षक-पालक व्हिसलब्लोअरची भूमिका निभाऊ इच्छितात त्यांना आपले मत निनावी किंवा नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर पाठवण्याची व्यवस्था निर्माण करणे .

       बोर्डाच्या परीक्षांच्या निकालात कॉपीचा सिंहाचा वाटा आहे हे बोर्ड -शिक्षण खाते नाकारत असले तरी असरचा रिपोर्ट त्याला छेद देतो हे डोळ्याआड करता येणार नाही . याविषयीचे मत शिक्षणमंत्र्यांनी सार्वजनिक मंचावरून व्यक्त करावेत म्हणजे कॉपीमुक्त परीक्षांचे अच्छे दिन कधी येणार की येणारच नाहीत याविषयीचा संभ्रम दूर होईल.