शिक्षण मंत्र्यांनी स्वत: केंद्रांना भेटी
द्याव्यात .
बारावी परीक्षेतील
कॉपी संदर्भात बोर्डाशी संपर्क साधला असता येणारा अनुभव अतिशय संतापजनक होता . प्राप्त
माहितीनुसार बोर्डाच्या तक्रार कक्षाकडे तक्रार
केली असता त्यांनी तक्रारीची गंभीर दखल घेण्याऐवजी तक्रार दाराच्या संपूर्ण तपशीलासह
fax पाठविण्यास सांगितले . बोर्ड अध्यक्षांच्या कार्यालयात
फोन लावून देखील टोलवाटोवीचे उत्तर मिळाले . ज्या पालकाचे पाल्य परीक्षा देते आहे तो
पालक संपूर्ण तपशिलासह परीक्षा केंद्रावरील कॉपी संदर्भात माहिती कशी देईल ? हि माहिती संबंधीत
शाळा -महावियालायाकडे पोहोचणार नाही आणि त्याच्या मुले आपल्या पाल्याला जाणीवपूर्वक
टार्गेट केले जाणार नाही याची हमी बोर्ड लेखी देईल का ? बोर्डाने नागरिकांच्या तक्रारींची दखल घ्यावी अन्यथा कॉपी मुक्त परीक्षाच्या
वल्गना बंद कराव्यात . जनतेवर विश्वास नसेल तर भविष्यात शिक्षण मंत्र्यांनी स्वत: परीक्षा
केंद्रांना भेटी द्याव्यात .
शिक्षण क्षेत्रातील वास्तवता कधीच पुढे आणली जात नाही
.शिक्षणक्षेत्रातील शिक्षक -अधिकारी यांचा कल हा नेहमीच ' ऑल इज ओके ' रिपोर्ट पाठवण्याकडे असतो . याचे सर्वोत्तम
उदाहरण म्हणजे बोर्डाच्या दहावी / बारावीच्या परीक्षा . शिक्षण क्षेत्राचा अभ्यासक
या नात्याने अनेक विद्यार्थी -शिक्षक -पालक यांच्याशी संपर्क येतो . आजही ग्रामीण आणि
शहरी भागात बोर्डाच्या परीक्षेत कॉपी होतेच आहे . फरक एवढाच पडला आहे की , पूर्वी केंद्राबाहेर जी जत्रा असायची , बाहेरून कॉप्यांचा पुरवढा व्हायचा त्याला प्रतिबंध बसला आहे परंतु त्याची परिपूर्ती
हि विषय शिक्षक , संस्था चालक करताना दिसत आहेत .
मुळातच परीक्षा
जर कॉपीमुक्त पद्धत्तीने घेतल्या तर निकालाचा आलेख ढासळेल याची भीती शिक्षक-संस्था
चालक -बोर्ड -आणि शिक्षण खाते या सर्वांना असल्यामुळे अनेक सहज सोपे उपाय दृष्टीक्षेपात
असून आणि ते वेळोवेळी मेल , प्रत्यक्ष शिक्षण
सचिव , बोर्डाचे अध्यक्ष , विभागीय सचिव आणि शिक्षण मंत्री यांना पाठवून देखील त्याला केराची टोपली दाखवली
जाते . कॉपी होतच नाही असे भासविले जाते त्यामुळे उपाय योजना आपसूकच निकालात निघतात
. बोर्डाच्या परीक्षांचे वास्तव जाणून घेण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी स्वतः केंद्रांना
आकस्मित भेटी द्याव्यात . त्याच बरोबर शिक्षक खात्यातील सचिव व अन्य अधिकाऱ्यांना तसे
निर्देश द्यावेत .
शिक्षण मंत्र्यांनी
खालील कॉपीमुक्त परीक्षांसाठी उपायांचा विचार करावा :
विषय शिक्षकांना त्या त्या पेपरच्या
दिवशी शिक्षणाधिकारी कार्यालयात हजार राहणे अनिवार्य करणे , विद्यार्थ्यांना स्वतःची शाळा केंद्र म्हणून न देणे , शाळा-शाळातील पर्यवेक्षकांची अदलाबदल करणे , गणितासारख्या विषयात स्वाध्यायातील प्रश्नच प्रश्नपत्रिकेत देताना
आकडे बदल करणे , शिक्षणबाह्य लोकांची त्रयस्त पर्यवेक्षक
म्हणून नियुक्ती करणे , परीक्षा केंद्रावर मोबाईलला पूर्णतः बंदी
घालणे , परीक्षार्थी विद्यार्थी / पालकांचा फीड बॉक घेणे
, प्रसारमाध्यमांना केंद्राला भेट देण्याची परवानगी
देणे , आगामी ३ वर्ष बोर्डाचा निकाल आणि अनुदान याचा
संबंध तोडणे , संस्थाचालकांना परीक्षेच्या काळात प्रवेशबंदी
, कॉपीची तक्रार करण्यासाठी मंत्रालयात तक्रार कक्ष , जे विद्यार्थी
-शिक्षक-पालक व्हिसलब्लोअरची भूमिका निभाऊ इच्छितात त्यांना आपले मत निनावी किंवा नाव
गुप्त ठेवण्याच्या अटीवर पाठवण्याची व्यवस्था निर्माण करणे .
बोर्डाच्या परीक्षांच्या निकालात कॉपीचा सिंहाचा
वाटा आहे हे बोर्ड -शिक्षण खाते नाकारत असले तरी असरचा रिपोर्ट त्याला छेद देतो हे
डोळ्याआड करता येणार नाही . याविषयीचे मत शिक्षणमंत्र्यांनी सार्वजनिक मंचावरून व्यक्त
करावेत म्हणजे “ कॉपीमुक्त परीक्षां ” चे अच्छे दिन कधी येणार की येणारच नाहीत
याविषयीचा संभ्रम दूर होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा