शुक्रवार, ९ जून, २०१७

न्यायालयीन हस्तक्षेप हाच शुद्ध शिक्षण व्यवस्थे च्या स्वप्नपूर्तीवरील सर्वोत्तम मार्ग* !!!


                  एनकेनप्रकारे स्वतःच स्वतःला संपवणे म्हणजे आत्महत्या ! सरकार कोणाचेही असू देत, शैक्षणिक संस्था या सरपंचापासून ते खासदारांपर्यंत बहुतांश  लोकप्रतिनिधीसाठी , प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरत असल्यामुळे “ शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण आणत , पारदर्शकता आणत ,शिक्षण व्यवस्थेचे शुद्धीकरण ” म्हणजे  नोकरशहा -लोकप्रतिनिधीसाठी आत्महत्याच ठरते . 
🈴 
                     राज्यातील सरकार बदलले परंतु प्रशासन , प्रशासनाची मानसिकता , भ्रष्ठाचारी वृत्ती कायम आहे या मताशी बहुतांश नागरिकांची पूर्णपणे सहमती असणार आहे . 
              🖥 *वस्तुतः भ्रष्ट शिक्षण व्यवस्था हा वर्तमानातील सर्वाधिक ज्वलंत प्रश्न आहे*

सोमवार, ५ जून, २०१७

परीक्षेतील गैरप्रकार आणि कॉपी प्रतिबंधात्मक संभाव्य उपाय योजने बाबत .




प्रति ,
मा . श्री . विनोद तावडे ,
शिक्षणमंत्री ,    महाराष्ट्र राज्य .

 विषय : परीक्षेतील गैरप्रकार आणि कॉपी  प्रतिबंधात्मक संभाव्य उपाय योजने बाबत .

         गैरप्रकार आणि कॉपीमुक्त परीक्षेच्या स्वप्नपूर्तीसाठी सरकारने पावले उचलत , व्हॉटसअँप वरील पेपरफुटी व परीक्षेतील अन्य गैरप्रकार , परीक्षा नियोजनातील त्रुटी , गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ८ सदस्यीय  समिती स्थापन करण्यासाठी सर्वप्रथम शिक्षणमंत्री आणि सरकारचे अभिनंदन .

                 एक पालक या नात्याने , गैरप्रकाराची कारणे आणि संभाव्य उपाययोजना आपल्या पर्यंत पोहचविण्यासाठी हा पत्रप्रपंच .

                 " परीक्षा = कॉपी ", " परीक्षा = गैरप्रकार "  यांचे नाते किती अतूट आहे हे अनेकवेळा 

अधोरेखीत झाले आहे  . विद्यमान परिस्थितीत परीक्षा कुठलीही असो ती " गैरप्रकारापासून मुक्त " राहीलच याची खात्री शिक्षणमंत्री सोडा खुद्द ब्रम्हदेव देखील देऊ शकेल काय याविषयी संद्धीगता आहे .

         कॉपी हा वर्तमान शिक्षण व्यवस्थेला लागलेला शाप आहे. कुठलेही कष्ट, मेहनत न करता यश मिळवायचे अशी नीतिशून्य धारणा समाजात दिसते. तिचे नितळ  प्रतिबिंब म्हणजे परीक्षेतील कॉपी होय. सामूहिक कॉपी व संबंधित यंत्रणेकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मिळणारे अभय ही एक फक्त कृती नसून सामाजिक-नैतिक मूल्यांची घसरण दर्शवणारी प्रवृत्तीच म्हणावी लागेल. मूल्यरहित समाजव्यवस्थेचे बीजांकुर शिक्षणातील गैरप्रकारामुळे रुजले जाणे निश्चितच अधिक धोकादायक संभवते, याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे वाटते.

      शिक्षणाचे बाजारीकरण भूछत्राप्रमाणे गल्लोगल्ली बालवाडी ते अभियांत्रिकी -वैद्यकीय यांची थाटलेली दुकाने व  त्यातून निर्माण झालेली अस्तित्वाची जीवघेणी स्पर्धा यामुळे कॉपी , मूल्यमापनातील गैरप्रकार , पेपरफुटी असे प्रकार शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनले आहेत हे कोणीच नाकारू शकत नाही. १०० टक्के निकालाचे धनुष्य पेलण्यासाठी स्वतः शिक्षक -मुख्याध्यापक -संस्थाचालक यांनी कॉपीचा अंगीकार केला असल्यामुळे आणि शासनाला  वाढत्या निकालाच्या आकडेवारीच्या आधाराने शिक्षणातील गुणवत्तेचा डांगोरा पीटत आपली पाठ थोपटता येत असल्यामुळे  परीक्षेतील गैरप्रकारांना अभय मिळताना दिसत आहे . कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार असल्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा महाराष्ट्रासाठी दिवास्वप्न ठरत आहे .