प्रति ,
मा . शिक्षणमंत्री ,
महाराष्ट्र राज्य .
विषय : पायाभूत चाचण्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी
या पायाभूत चाचण्या त्रयस्त यंत्रणेमार्फत घ्या अन्यथा दिशाभूल थांबवा ... ,
(पायाभूत चाचण्या त्रयस्त यंत्रणेमार्फतच घेण्यातच 'अर्थ ' अन्यथा तो एक 'निरर्थक ' सोपस्कार (च )!)
" प्रश्न / समस्यांवरील उत्तर / उपाय म्हणजेच आणखी एक प्रश्नाची निर्मिती आणि समस्येत भर " वर्तमान शिक्षण विभागाच्या या कार्यसंस्कृतीमुळे महाराष्ट्र प्रगत शिक्षण उपक्रमांतर्गत खरंच प्रगत होणार की नेहमीप्रमाणे तो एक "कागदोपत्री ऑल इज वेल " सोपस्कार ठरणार या प्रश्नाचे उत्तर भविष्याच्या उदरात दडलेले असल्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे भविष्य किती 'प्रगत ' असणार याचे ऊत्तर देखील त्यातच दडलेले आहे . हा प्रश्न उपस्थित करण्यामागचे प्रयोजन म्हणजे ७ ते १२ सप्टेंबर या कलालावधीत इयत्ता २री ते आठवीच्या विद्यार्थ्यांची घेण्यात आलेली पायाभूत चाचणी आणि इयत्ता ९वीच्या विद्यार्थ्यांची घेण्यात आलेली नैदानिक चाचणी.
LINK FOR PUBLISHED ARTICLE
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/13092017/0/7/