कृत्रिम
गुणवत्तेच्या वावटळीत शिक्षण व्यवस्था “दिशाहीन “ होतेय !
➤ विशेष सूचना : हा लेख " तुम्ही -आम्ही पालक " या शिक्षण विशेष दिवाळी अंकात (२०१७) प्रकाशित झाला आहे
शिक्षण हा लोकशाहीचा पाचवा स्तंभ . त्या त्या देशाचे शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता
हि त्या देशाची ओळख असते . व्यक्ती -समाज -राष्ट्र निर्मितीचा मार्ग हा शिक्षणातून
जात असल्यामुळे शिक्षणाला राष्ट्रनिर्मितीत अनन्यसाधारण महत्व असते . शिक्षणाला
योग्य दिशा देणारी यंत्रणा सक्षम असेल तर राष्ट्राची भरभराट सुसाट होते याचा
मूर्तिमंत दाखला असणारा देश म्हणजे चीन .