गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

विद्यापीठ विश्वासार्हता जतन -संवर्धनासाठी मुंबई विद्यापीठाचा कारभार ' डोळस 'च हवा !!!

    
 " विज्ञान :शाप की वरदान "हा निबंध शाळेत लिहत असताना मन नेहमी दोलायमान अवस्थेत असायचे . पण आता जेंव्हा मुंबई विद्यापीठाचा 'संगणकाधारीत ऑनलाईन मूल्यांकन प्रकरणाचा गोंधळ पाहिला तेंव्हा पक्के लक्षात आले की विज्ञानाला ना १०० टक्के वरदान वा ना १०० टक्के शाप संबोधले जाऊ शकते कारण शाप की वरदान हे अंतिमतः ठरते ते वापरणाऱ्याच्या क्षमतेवर दृष्टिकोनावर ,हेतूवर .

           विज्ञानावर निबंध लिहताना विज्ञानाला शाप ठरवताना बहुतांश वेळेला 'सोनोग्राफी मशिन्सचा गर्भातील अर्भक मुलगा की मुलगी हे पाहून केला जाणारा गर्भपात हे उदाहरण ठरलेले असायचे . मुलीच्या जन्मास नकार हि मानसिकतेच दोष मशीनवर टाकणे हि वस्तुतः  आत्मवंचनाच ठरते कारण हा दोष सोनोग्राफी मशीनचा नसून समस्त समाजाचा आहे . याच न्यायाने मुंबई विद्यापीठाचा ऑनस्क्रीन असेसमेंट नापास होण्यात दोष तंत्रज्ञानाचा नसून तो या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी संलग्न सर्व घटकांचा आहे .

          .... अखेर कुलपतींनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉसंजय देशमुख यांना कुलगुरूपदावरून दूर केले आहे . अर्थातच या मागचे प्रमुख कारण आहे ते म्हणजे ऑनस्क्रीन असेसमेंट निर्णय आणि त्यातील न भूतो न भविष्यते !अशा गोंधळामुळे निकालास झालेला अतिविलंब . यामुळे कदाचीत विद्यार्थ्यांकडून भविष्यात विज्ञानाला शाप असे संबोधताना मुंबई विद्यापीठाचे ऑनस्क्रीन असेसमेंट आणि त्यातून कुलुगुरुंची हकालपट्टी हे उदाहरण दिले जाऊ शकते .

        प्रत्येक विषयाचे राजकारण करण्याच्या आपल्या संस्कृतीमुळे आपण कुठलाच धडा घेत नाहीत हाच आजवरचा आपला इतिहास आहे हेच कटू सत्य आहे.  यापार्श्वभूमीवर भविष्यात "शिक्षण क्षेत्र हे प्रयोगाचे क्षेत्र नाही " हा  किमान धडा मुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रकरणातून घेतला तरी शिक्षण विभागमहाराष्ट्र शासन विद्यापीठे “   मेरीटने  पास  झाले असे म्हणता येतील .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा