मा . उच्च न्यायालयाने गणित
विषयातील नापासांची संख्या आणि त्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणातील संभाव्य अडथळा
याचा विचार करून , गणित हा विषय '
ऐच्छिक
' होऊ शकतो का ?
अशी
विचारणा बोर्डाला केल्यामुळे गणिताला पर्यायी विषयाच्या चर्चेला तोंड फुटले आहे .
गणिताला पर्यायी विषयाचा विचार करणे हा प्रकार मुळातच समस्येच्या मुळाशी न जाता
वरवरच्या अंगाने समस्येचे सुलभीकरण करण्याचा प्रकार ठरतो .
आपल्याकडे एकुणातच आपल्या कडील शिक्षण '
खात्या
' ची अंगभूत कार्यसंस्कृती हि ,
समस्या
-प्रश्न मान्यच न करणे , नाकारणे या धाटणीतील आहे .शिक्षण विभाग
हा विद्यार्थी -पालकांना उत्तरदायी असल्याचे सांगितले जात असले तरी ते कधीच
पालकांच्या पत्राला , मेलला उत्तर देत नाहीत . समस्या मान्यच केली नाही तर त्याच्या निरकरणाची
जबाबदारी आपसूकच नाकारली जाते . सोपा उपाय . परंतू दस्तुरखुद्द न्यायालयानेच
प्रश्न केल्यामुळे तर विचार करतीलच परंतू
गणित विषयाला पर्यायी विषय दिल्यास आपला निकाल शंभरीपार नेण्याचा सुलभमार्ग आपसूकच
निर्माण होईल त्यामुळे कदाचीत शिक्षण विभागाचेच सर्वप्रथम उत्तर हे '
सकारात्मक
' ( हा हि एक अपवादच ठरेल ?)
असू
शकेल .
दोष अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धतीचा :
आयुष्यातील कोणताही कठीण निर्णय घेताना गणिती विचार पद्धती अतिशय उपयुक्त
असते असे अनेक शास्त्रज्ञ सांगतात त्यामुळे यदाकदाचित शासनाने गणिताला ऐच्छिक
विषयाचा दर्जा दिलाच तर तो प्रकार ' समस्त समाजाच्या पायावर धोंडा '
घातल्याचा
असू शकेल . शिक्षणात गणिताला नाकारणे म्हणजे शरीराला '
प्राणवायू
'ची गरज नाकारण्यासारखे होय . गणित विषय हा अनेक
विद्यार्थ्यांना ' कठीण '
वाटतो
हे वास्तव नाकारता येत नाही . परंतू त्याचे मूळ हे गणितात नसून आपल्या शिक्षणात ,शिक्षण खात्याचे दिशाहीन अधिकारी -मंत्री , अभ्याक्रमात ,
अल्पज्ञानी शिक्षक आणि निरस /रुक्ष अध्यापन पद्धत , मूल्यमापन पद्धतीत आहे हे सुद्धा नाकारता येत नाही .
अल्पज्ञानी शिक्षक आणि निरस /रुक्ष अध्यापन पद्धत , मूल्यमापन पद्धतीत आहे हे सुद्धा नाकारता येत नाही .
आजही स्वतःला
स्वतःच नामवंत , इंटरनॅशनल 'गृहीत '
धरणाऱ्या शाळांमध्ये गणिताचे '
पात्र
' शिक्षक नसतात . प्राप्त माहितीनुसार जवळपास ८०
टक्के गणित शिकवणाऱ्या शिक्षकांचे गणिताचे शिक्षण हे १२वीच्या पुढील नाही . गणित
पदवीधर शिक्षकांची संख्या अल्प आहे .गणित शिकवणारे अनेक शिक्षक हे अन्य विषयातील
पदवीधर आहेत . दहावीनंतर २/३ वर्ष 'कागदोपत्री '
डीएड/बीएड
झालेले शिक्षकांची भाऊगर्दी आहे . जिल्हापरिषदेच्या शाळेत तर एकच शिक्षक सर्व
विषयांचा 'मास्टर'असतो . प्रथमच्या असर आवाहलानुसार
तिसरीच्या सुमारे ७४ टक्के मुलांना हातच्याची वजाबाकी येत नाही ,
आठवीच्या
३१ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत नाही .
मुळातच 'पाया '
कच्चा
असणारे हे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत नापास होत असतील तर तो दोष गणिताचा कसा ?
एक
गोष्ट लक्षात घेणे गरजेची आहे ती म्हणजे बोर्ड कोणतेही असो जर स्वायत्त
यंत्रणेमार्फत व पारदर्शक कॉपीमुक्त पद्धतीने 'खऱ्या '
परीक्षा
घेतल्या तर सर्वच विषयांचा निकाल हा पन्नाशी पार करणार नाही हे कटू सत्य आहे . मग
दोष सगळ्याच विषयांना देणार का ? गणिताची नावड दूर करण्यासाठी आजवर काय
प्रयत्न शिक्षण विभागाने /बोर्डाने केले हे देखील जनतेसमोर यायला हवे .
सर्वात महत्वाचे हे की ,
ज्यांना
-ज्यांना 'अवघड' गणितामुळे मुले शिक्षणापासून /पदवीपासून वंचीत
राहतात असे प्रामाणिकपणे वाटते त्यांनी -त्यांनी आजही शाळेचे तोंड देखील न पाहणारी लाखो मुले ,
खाजगी
शाळा /कॉलेजचे शुल्क परवडत नसल्यामुळे , करोडो रुपये खर्चूनही सरकारी शाळांत
गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्यामुळे पदवी /उच्च शिक्षणापासून वंचीत राहतात
याकडेही लक्ष देत करोडो विद्यार्थ्यांना 'न्याय '
मिळेल
हे देखील पहावे . केवळ गणिताच्या नावाने मुले शिक्षणापासून वंचित राहतात असे 'गृहीत'
धरणे
दांभिकता ठरेल .
गणिताचा तसा व्यावहारीक
आयुष्यात काय उपयोग ?हे 'गृहीतक '
पुढे
करत गणिताच्या हद्दपारीचा पाया रचला जात आहे . मग याच न्यायाने सर्वच विषयांची
हद्दपारी करावी लागेल . गणिताचे सरळ -साधे सूत्र आहे की कुठल्याही प्रमेयातील 'गृहीतक '
चुकले
तर अंतिम 'निष्कर्ष '
(फलनिष्पत्ती
) चुकणारच . इथे ' गणित विषय अवघड आहे '
हे
गृहीतक चुकत आहे. गणित हा पूर्ण मार्क देणारा देखील विषय आहे याकडे मात्र
जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. गणिताला थेट पर्यायी विषय हा टोकाचा निर्णय
घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांना सामान्य गणित आणि उच्च गणित हा पर्याय सुवर्णमध्य
ठरतो . त्याही पुढे म्हणजे केवळ विद्यार्थी पास करणे हेच जर अंतिम ध्येय असेन तर
५० मार्क गणित व ५० मार्क संस्कृत वा पर्यावरण हे सूत्रही अवलंबवता येईल .
सर्वात महत्वाचे हे की गणित
हा केवळ पास -नापासापुरता मर्यादीत विषय नाही . गणित हे एक शास्त्र आहे .
गणितामुळे निर्णयक्षमता , विश्लेषण -तार्किकविचार क्षमता ,
समस्येला
सामोरे जात धीरोदात्तपणे स्टेप-स्टेपने समस्या निवारण क्षमता हि वृद्धिंगत होत
असते जी की पदोपदी जीवनातील संघर्षाला सामोरे जाण्यासाठी ,
आयुष्याचे
गणित सोडविण्यासाठी अत्यंत आवश्यक असते .
सुवर्णमध्य साधावा :
अगदीच
कुठलीही टोकाची भूमिका घेण्याऐवजी याबाबतीत सुवर्णमध्य साधणे जास्त उचीत ठरेल .
- १) आठवी पर्यँत सामान्य गणित सर्वांसाठी अनिवार्य असावे .
- २) ज्या विद्यार्थ्यांना गणित अनिवार्य असणाऱ्या विषयामध्ये /शाखेमध्ये शिक्षण घ्यावयाचे आहे त्यांना सध्या आहे तेच गणित कन्टीन्यू ठेवावे .
- ३) ज्या विद्यार्थ्यांना गणित घेऊन दहावी पास होणे अशक्य वाटते आहे त्यांच्यासाठी वर्तमान गणित ५० मार्कांचे आणि ५० मार्कांचा संस्कृत /सामान्यज्ञान / आयटी असा विषय ठेवावा .
शेवटी एक गोष्ट लक्षात
ठेवायला हवी की , शिक्षण क्षेत्र हे प्रयोगाचे क्षेत्र
नाही कारण शिक्षणामधील मधील कुठल्याही निर्णयाचा थेट संबंध असतो तो थेट एका पिढीशी
. त्यामुळे साधकबाधक ,सखोल चर्चा करूनच योग्य योग्य निर्णय
घ्यायला हवा . दुःख या गोष्टीचे आहे की , ज्या देशाने जगाला शून्याची देणगी दिली
त्याच देशात गणिताला शिक्षणात 'शून्य' करण्याचा विचार मूळ धरावा आणि तोही चुकीच्या
गृहितकावर आधारीत . कुठल्याही गोष्टीची भीती हि उपजत नसते ,
ती
निर्माण होते ती परिस्थितीतून-अनुभवातून ,आजूबाजूच्या लोकांच्या अनुभवातून . याच
न्यायाने आज जी विद्यार्थ्यांना गणिताचा बाऊ वाटतो आहे त्याचे कारण आहे ते म्हणजे
गणित विषय रंजकपणे-रुचीपूर्ण पद्धतीने न शिकवण्यात . गणिताला हद्दपार करण्यापेक्षा
गणित विषयाच्या निरस अध्यापनाला , अपात्र शिक्षकांना ,क्लिष्ट मूल्यमापन पद्धतीला हद्दपार
करण्याची गरज आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा