बोर्डाच्या पहिल्या फेरपरीक्षेचा निकाल २५ टक्के लागला आहे . परीक्षा या
शिक्षण पद्धतीतील महत्वाचा घटक . वर्तमान परीक्षा या विद्यार्थ्यांच्या केवळ
स्मरणशक्तीचा (?)
कस पाहणाऱ्या ठरतायेत त्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपामुळे . प्रश्नपत्रिकेत
थोडासा बदल केल्यास वर्तमान परीक्षांना लागलेली सामुहिक कॉपीच्या किडीस आळा तर बसेनच
आणि त्याच बरोबर त्या विद्यार्थ्यांच्या आकलनाची कसोटी पाहणाऱ्या हि ठरतील .
कसा असावा तो बदल या विषयी थोडेसे : विद्यमान परीक्षांत केवळ आणि केवळ स्वाध्यायातील
प्रश्न ' जसेच्या
तसे ' विचारण्याचा
नियम आहे . या दोषामुळे विद्यार्थी “ स्टार संस्कृती
” जपताना दिसतात म्हणजे नवनीत व अपेक्षीत मध्ये धड्या खालील
प्रश्नांना (*) केलेले असते . विद्यार्थ्यांना केवळ स्वाध्यायातीलच प्रश्न विचारले
जातात हे ज्ञात असल्यामुळे ते अन्य प्रश्नांकडे डोकून देखील पाहत नाहीत . प्रश्नपत्रिकांच्या
ढोकळ स्वरूपामुळे विद्यार्थी संपूर्ण धड्याचे वाचन देखील करत नाहीत
.
दुसरा महत्वाचा मुद्दा हा की , स्वाध्यायातील
प्रश्नांचे उत्तर नवनीत व अपेक्षित मध्ये उपलब्ध असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे आणि
शाळांचे ' उज्वल
भवितव्य ' केवळ
परीक्षेतील कॉपीवर अवलंबून आहे त्यांचेही फावते .
या सर्व दूषपरिणामावर मात करण्यासाठी प्रश्नपत्रिकांच्या स्वरुपात बदल करायला
हवा . केवळ स्वाध्यायातीलच प्रश्न या झापडबंद
दृष्टीकोनातून बाहेर पडत धड्यातील आशयावरील कुठलाही प्रश्न याचे अनुकरण करावे . सुरुवातीला
एखादे वर्ष हा बदल रिकाम्या जागा , एका वाक्यात
उत्तरे , जोड्या
जुळवा या पुरता मर्यादीत ठेवावा . सर्वसाधारणपणे एका पुस्तकात १३ ते १५ धडे असतात
. प्रत्येक धड्याच्या स्वाध्यायात ५ रिकाम्या जागा , ५ जोड्या , ५ एका वाक्यात उत्तरे , ५ कोणकोणास
म्हणाले या सम प्रश्न असतात .अंतर्गत मूल्यमापनात सर्रास पणे १८ ते २० मार्क्स दिले
जातात म्हणजेच बोर्डाची परीक्षा कुठलाही विद्यार्थी
पुस्तक न उघडता केवळ ३०० ओळींचे पाठांतर केले
तरी उतीर्ण होऊ शकतो .
सध्यातर विद्यार्थी गणित देखील पाठ करताना दिसतात
. हे टाळण्यासाठी प्रश्नांचे स्वरूप स्वाध्यायातीलच
ठेवून किमान त्यातील काही आकडे बदलावीत . उदाहरणार्थ स्वाध्यायात जर ५ पायऱ्यांच्या
जिण्यासाठी लागणाऱ्या विटांची संख्या विचारली असेन तर परीक्षेत किमान पायऱ्यांची संख्या
बदलावी किंवा विटांच्या लांबी -रुंदीत बदल करावा . उद्देश विद्यार्थाला कन्सेप्ट समजली
आहे का ? हा तपासणारा असावा . प्रश्नपत्रिकेत यासम
बदल केल्यास विद्यार्थ्यांच्या आकलनाची -ज्ञानाची कसोटी लागेलच त्याच बरोबर सामुहिक
कॉपीला आळाही बसेल .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा