- मा . शिक्षण मंत्री श्री . विनोद तावडेंना शिक्षण व्यवस्थेतील विविध विषयावर ( शैक्षणिक संस्थात पारदर्शकतेची आवश्यकता , बोर्डांच्या परीक्षेचा दर्जा , कृत्रिम गुणवत्ता , स्कूलबस शुल्क नियमन -नियंत्रण ) निवेदन देताना व चर्चा करताना :
================================================================= मा . विनोद तावडे ,
शिक्षणमंत्री,
महाराष्ट्र राज्य .
विषय :शालेय बस शुल्क निर्धारण आणि नियंत्रणा बाबत .
महोदय ,
वाढत्या नागरीकरणामुळे शालेय बस
(स्कूल बस ) सेवा अनिवार्य ठरते आहे . मुंबई -पुणे -ठाणे -नागपूर यासम शहरात तर तो
शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनला आहे असे म्हटले तर अतिशोयुक्तीचे ठरणार नाही
. स्कूलबस सेवेची अनिवार्यता लक्षात घेऊन काही शाळांनी स्वतःच्या बसेस विकत
घेतल्या आहेत तर काही शाळा खाजगी खाजगी बसेसच्या माध्यमातून सेवा देतात . त्याच
बरोबर विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत ने -आण करण्याची सुविधा काही "
स्कूल व्हन " चालक देखील देतात .
प्रश्न आहे तो पालकांच्या असहायतेचा
गैरफायदा घेत अनेक शाळा आणि खाजगी सेवा देणारे पुरवठादार मनमानी पद्धत्तीने शुल्क
वसूल करताना दिसतात . ३-४ किलोमीटरच्या अंतरासाठी अगदी १००० ते १२०० तर ८/१०
किमीसाठी प्रती महिना १८०० ते २१०० रुपये शुल्क आकारतात . नवी मुंबईतील एका नामवंत
(?) इंटरनशनल
(?) शाळेचे
खारघर ते नेरूळ (साधारण 15 किमी ) बसचे वार्षिक दर रु २७६१०/ हजार आहे .
बहुतांश शाळांना ५ दिवसांचा आठवडा असतो आणि इतर सर्व सुट्ट्या
लक्षात घेता संपूर्ण वर्षात अधिकत्तम २२०-२३५ दिवस बससेवा दिली जाते मात्र पालकांकडून ३६५ दिवसाचे शुल्क आकारले जाते . हे
कमी की काय म्हणून प्रती वर्षी शुल्क वाढवले जाते . वस्तुतः गेल्या २/३ वर्षात
डिझेलच्या दरवाढ नावाखाली भरमसाठ शुल्क वाढवलेले असताना परंतू या वर्षी डिझेलचे दर
कमी झालेले असताना देखील बस शुल्क वाढ केली गेली . हे पूर्णपणे अन्यायकारक आहे .
महोदय , परिवहन
मंत्री या नात्याने महाराष्ट्रातील तमाम पालकाच्या वतीने आपणास नम्र निवेदन आहे की
, इंधन
दर , चालक-मदतनीस
आणि इतर आवश्यक गोष्टींचा विचार करून शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठीचे वाहनाच्या
प्रकरानुसार प्रती किमीचे/ टप्प्याचे दर
निर्धारण करणारे सूत्र तयार करावे जेणे करून मनमानी पद्धत्तीने आकारल्या जाणाऱ्या
शुल्कामुळे पालकांची होणारी आर्थिक लुट टळेल .
परिवहन विभागाने पूर्वी वेळोवेळी योजलेल्या उपाय
योजनांमुळे सध्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची सुरक्षितता मिळते आहे आणि
यासाठी तमाम पालक वर्ग आपला ऋणी आहे .
आपण या पत्राची योग्य दखल घ्याल आणि त्याच
बरोबर शालेय वाहतूक सेवा देणारे आणि पालक या दोघांना समान न्याय देणारे सूत्र
अस्तित्वात आणाल याची खात्री असल्यामुळेच हा पत्रप्रपंच .
धन्यवाद .
आपला नम्र ,
सुधीर दाणी , ९८६९२२६२७२
प्रत :
·
मा . शिक्षणमंत्री , महाराष्ट्र राज्य ,
·
शिक्षण आयुक्त ,
महाराष्ट्र
राज्य ,
·
शिक्षण सचिव ,
महाराष्ट्र
राज्य.
·
==================================================================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा